पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) मुख्याध्यापक डायरीचे प्रकाशन झाले. या डायरीत शाळेच्या सुरळीत कामकाजासाठी मुख्यध्यापकांना आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध आहे.
ललित कुमार शर्मा यांच्या प्रयत्नातून हि डायरी साकारण्यात आली असून, त्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूलच्या मुख्याध्यापीका राज अलोनी, ललित कुमार शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
भारतात अशा प्रकारची प्रकाशित होणारी सीबीएसई शाळा ए विशेष पहिली डायरी आहे. या डायरीमध्ये शाळेच्या सुरळीत कामकाजासाठी सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापकांना आवश्यक असलेली सर्व माहिती आहे आणि शाळेच्या तपासणीसाठी सर्व तपशील भरून तयार तक्ता बनवलेला आहे, जो आवश्यक असेल तेव्हा मुख्याध्यापकांना शाळेबद्दल सर्व माहिती पुरवितो.
खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी (राज्य पुरस्कारित) यांनी मुख्याध्यापकांची डायरी यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती संकलित केलेली आहे. राज अलोनी या मुख्याध्यापकांच्या एक प्रशंसनीय व प्रख्यात प्रशिक्षक आहेत, त्यांनी खूप मेहनत घेऊन मुख्याध्यापकांना त्यांच्या स्वप्नातील प्रकल्प त्यांना काय माहित नाही हे जाणून घेण्यास सक्षम व प्रशिक्षित केलेले आहे, म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी अशा प्रकारच्या पहिल्या ज्ञानकोशाचे प्रकाशन केले आहे.
ललित कुमार शर्मा यांनी ही विशेष मुख्याध्यापक डायरी छापली असून या डायरीला अंकित मुख्याध्यापक डायरी म्हणूनही ओळखले जाते. ललित कुमार शर्मा हे भारतीय नौदलात कार्यरत होते. त्यांनी 1996 मध्ये अंकित एंटरप्राइजेस सुरू केलेली आहे. आज ते 20 पेक्षा जास्त वर्ष 100 पेक्षा जास्त प्रकाशकांसोबत कार्यरत आहेत आणि त्यांनी पाच दशलक्षाहून अधिक उत्पादने विकली आहेत.
एक परोपकारी म्हणून त्यांना गोव्याच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचे होते, म्हणून त्यांनी अंकित पाठशाळा हा ई-लर्निग प्लॅटफॉर्म विकसित केला आणि विशेषत: गोवा राज्य मंडळाच्या शाळांसाठी हा प्लॅटफॉर्म गोव्याच्या विविध विशेष शाळांना विनामूल्य देऊ केला आहे.