Breaking News

सीकेटी महाविद्यालयाला ‘चॅम्पियनशिप’

रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मिळविली सर्वाधिक पारितोषिके

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया ‘रायगड जिल्हा विभागीय चॅम्पियनशिप’ जिंकण्याचा बहुमान मिळविला आहे. सीकेटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन झालेल्या 54व्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग सतरा वर्ष सर्वाधिक 13 पारितोषिके प्राप्त करून दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे.

दरवर्षी होणार्‍या या स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण 16 महाविद्यालये सहभागी झाली होती. कोरोना काळ चालु असल्यामुळे ही स्पर्धा ऑनलाइन स्वरुपामध्ये घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये नृत्य, अभिनय, साहित्य, फाईन आर्ट व संगीत या क्षेत्रांतील एकूण 15 वैयक्तिक प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने सर्वच्या सर्व स्पर्धा प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धार्ंंपैकी 14 स्पर्धा प्रकारांचे निकाल जाहीर करण्यात आले. जाहीर झालेल्या 14 स्पर्धांच्या निकालांपैकी चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने 13 पारितोषिके प्राप्त केली.

या 13 पारितोषिकांपैकी पाच प्रथम क्रमांकाची पारितोषिके, सहा द्वितीय क्रमांकाची आणि दोन तृतीय क्रमांकाची पारितोषिके महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविली आहेत. सन 2005 ते 2021 या 16 वर्षांमध्ये चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने या स्पर्धामध्ये सर्वाधिक पारितोषिके प्राप्त केली होती. या वर्षीही सर्वाधिक पारितोषके प्राप्त करून सांस्कृतिक क्षेत्रात रायगड जिल्हयात निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे.

सर्व पारितोषिक विजेते विद्यार्थी, महाविद्यालयाचा सांस्कृतिक चमू व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. वी. येवले व सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप यांचे या दैदिप्यमान यशाच्या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेलचे आमदारप्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अनिल भगत, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकवर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

प्राप्त वैयक्तिक पारितोषिके

चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक प्रिया चौधरी, भित्तीचित्र स्पर्धा प्रथम क्रमांक ज्योती धायगुडे, कारटूनिग स्पर्धा प्रथम क्रमांक ऋुतुजा पाटील, सुगम संगीत प्रथम क्रमांक निलेश गायकवाड, एकपात्री अभिनय स्पर्धा हिंदी प्रथम क्रमांक मुग्धा दातार, शास्त्रीय वादन(तालवाद्य) स्पर्धा द्वितीय क्रमांक प्रथम गोवेकर, मराठी कथाकथन स्पर्धा द्वितीय क्रमांक मुग्धा दातार, मेंहदी द्वितीय क्रमांक रिया कर्ण, शास्त्रीय गायन द्वितीय क्रमांक कोमल राजगुरू, पाश्चात्य गायन स्पर्धा द्वितीय क्रमांक स्मीती गायकवाड, पाश्चात्य वादण द्वितीय क्रमांक प्रथम गोवेकर, वत्कृत्व अभिनय स्पर्धा मराठी तृतीय क्रमांक प्रिया चौधरी, मिमिक्री स्पर्धा तृतीय क्रमांक क्षितीज गायकवाड.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply