Breaking News

पनवेल युवा मोर्चाकडून राहुल गांधींचा तीव्र निषेध

तहसीलदारांना दिले कारवाईसाठी निवेदन

पनवेल ः प्रतिनिधी
आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 16) करण्यात आली. निषेध रॅली काढून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍या राहुल गांधींचा धिक्कार असो, स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे, अशा घोषणा देत पनवेल युवा मोर्चाने राहुल गांधींचा जाहीर निषेध केला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा देशभरात निषेध होत आहे. राहुल यांच्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत, तसेच त्यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. त्याअंतर्गत पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय येथून ही निषेध रॅली काढण्यात आली. या निषेधाचे निवेदन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांना कारवाईसाठी देण्यात आले.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृनेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, निलेश बाविस्कर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सीता पाटील, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, माजी नगरसेविका नीता माळी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भूपेंद्र पाटील, महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, शफी पटेल, मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध रॅलीत सहभागी झाले होते.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply