Breaking News

नवी मुंबईतील 19 पोलिसांना बढती

पनवेल : वार्ताहर

राज्यातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक अस्थापना संजीवकुमार सिंघल यांनी बुधवारी (दि. 2) दिले आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस दलातील 19 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बढती मिळाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाबरोबरच मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मूळ सेवाज्येष्ठतेनुसार राज्य पोलीस दलातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या अधिकार्‍यांची निशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीवर पदस्थापना करण्यात आली आहे. ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध खातेनिहाय चौकशी, गुन्हा, निलंबनाची कारवाई झाली आहे त्यांच्याबाबत संबंधित घटक प्रमुख यांनी पोलीस महासंचालक कार्यालयास कळवावे, असे आदेशात म्हटले आहे.

ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तसेच आचारसंहिता लागू आहे त्या ठिकाणच्या घटक प्रमुखांनी निवडणूक आयोगाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करावी, असेदेखील आदेशात सांगण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळालेल्या सर्व अधिकार्‍यांचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी अभिनंदन केले आहे. राज्य पोलीस दलातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांपैकी नवी मुंबई पोलीस आयुक्तालायातील 19 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे या पोलिसांचे मित्रपरिवार, हितचिंतकांकडून अभिनंदन केले जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply