उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात शुक्रवारी (दि .19) तीन नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. त्यात जांभुळपाडा येथील 18 वर्षीय पुरुष, तांडेलनगर येथील 31 महिला, जासई येथील 35 वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तसेच कोंढरीपाडा करंजा येथील 60 वर्षीय पुरुष यांचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात शुक्रवारी कोटनाका येथील 38 व 36 वर्षीय पुरुष, जेएनपीटी येथील 29 वर्षीय महिला, चाणजे तांडेलनगर येथील 35 वर्षीय पुरुष बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 200 झाली आहे. त्यातील 171 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 26 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
त्यातील कामोठे एमजीएम रुग्णालयात चार, पनवेल येथील (कोविड) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पाच, एमजीएम हॉस्पिटल वाशी येथे एक,अपोलो हॉस्पिटल सीबीडी येथे एक, डि. वाय. पाटील हॉस्पिटल तीन, कोरोना केअर सेंटर बोकडविरा 12 असे एकूण 26 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, ही माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
माणगाव येथील नाणोरे परिसर कंटेन्मेंट झोन
माणगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मौजे नाणोरे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहत असलेले मौजे नाणोरे, ता.माणगाव येथील नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.12, नाणोरे-माणगाव मधील समाधान गंगाराम उत्तेकर यांचे घर ते साई मंदिर नाणोरे परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.