पनवेल : वार्ताहर
पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाचा निधी वितरणाचा कार्यक्रम काश्यप हॉलमध्ये झाला. या वर्षी अलिबाग येथील गोपालन संस्थेला 71 हजार रूपये आणि पनवेलजवळील करूणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस या संस्थेला 25 हजार रुपये निधी देण्यात आला.
निधीचे धनादेश डॉ. समिधा गांधी व डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सुमारे 35 सभासद हजर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना गीतांजली ग्राहक संघाचे संघप्रमुख रमेश एरंडे यांनी केली. यामध्ये, 2018 पासून संस्थांना दिल्या जाणार्या मदतीचा योग्य आढावा घेतला. गीतांजली ग्राहक संघ आपत्तीच्या वेळेला धाऊन येतो हेही दोन उदाहरणे सांगून सर्व सभासदांचे आभार मानले. सूत्रसंचालन विजय भिडे यांनी, तर उपस्थितांचे संजय कजबजे यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट सुचित्रा गोखले यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाला.