Breaking News

कोमसापच्या मुरूड-जंजिरा शाखाध्यक्षपदी संजय गुंजाळ

मुरूड ः प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषद मुरूड-जंजिरा शाखेची सर्वसाधारण सभा नुकतीच नगर परिषद शाळा क्रमांक 4 येथील सभागृहात झाली. या सभेत 2021 ते 2024 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड ज्येष्ठ गायक डॉ. रवींद्र नामजोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यात शाखाध्यक्षपदी संजय गुंजाळ यांची निवड झाली.

कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उषा खोत, कार्याध्यक्षपदी अरुण बागडे, सचिवपदी नैनिता कर्णिक, सहसचिवपदी प्रतिभा मोहिले, खजिनदारपदी प्रतिभा जोशी, उपखजिनदारपदी उर्मिला नामजोशी, जिल्हा प्रतिनिधी म्हणून सिद्धेश लखमदे, युवाशक्ती प्रमुख आशिष पाटील यांची सर्वानुमते

निवड झाली.

नवीन कार्यकारिणीच्या उपस्थितीत 27 फेब्रुवारी रोजी साजर्‍या केल्या जाणार्‍या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. नवनिर्वाचित शाखाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कोकण मराठी साहित्य परिषदेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. मराठी भाषेचा विकास व तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विविध उपक्रम राबवून तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचासुद्धा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. सचिव नैनिता कर्णिक यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून सभा संपल्याचे जाहीर केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply