कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक महेश खाडे यांना शैक्षणिक उपक्रमासाठी टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन सांगली आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंग्लिश रिडींग बाय फोनेटिक या विषयावरील उपक्रमाबद्दल त्यांचा सन्मान झाला आहे.
महेश खाडे हे कर्जत तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत. पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या सोहळ्यामध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शिक्षणविषयक तीन पुस्तके आणि धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.