Breaking News

बाजाराचा कल ओळखा आणि कमाई करा!

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com

शेअर बाजारातील गुंतवणुकीत कल ओळखण्यास फार महत्त्व आहे. ज्यांना हा कल लक्षात येतो ते शेअर बाजारात कमाई करतात. आणि ज्यांना कमाई करावयाची त्यांनी या कलासोबत राहिले पाहिजे असे म्हणतात. आज आपण केवळ ’कल’ याच गोष्टीबाबत पाहू यात…

आधी अमेरिकेच्या फेडने व्याजदर वाढविण्यासंदर्भात केलेली घोषणा, नंतर रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची निर्माण झालेली शक्यता, गुरुवारी युक्रेनवर झालेला हल्ला आणि त्यानंतर झालेल्या अनेक जागतिक घडामोडी यामुळे मागील दोन आठवड्यात बाजारानं चांगलाच रंग दाखवला आहे. अर्थात, अशा घटना काही नेहमी घडत नाहीत. मग इतर वेळी बाजारातील कल कसा ठरत असतो? परंतु हा रंग ओळखण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक सर्व अगदी जिवाचं रान करताना आढळतात, परंतु फार कमी लोकांनाच यात यश मिळताना दिसतं आणि बहुधा असं यश हे चुकून लागलेल्या मटक्यासारखं असतं.., परंतु बाजाराचा अगदी अचूक रंग ओळखण्यात जरी आपण यशस्वी ठरलो नाही तरी काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्याला बाजार खूप महाग झालाय किंवा स्वस्त झालाय हे कळू शकतं. जेव्हा पानवाल्यापासून लाँड्रीवाल्यापर्यंत कोणीही तुम्हाला एखाद्या कंपनीच्या शेअर खरेदीबद्दल (फुकटची) टीप देऊ लागतो तेंव्हा ओळखावं की बाजार स्वस्त (सहज) म्हणजेच बाजाराच्या भाषेत महाग म्हणजेच ओव्हर बॉट झालाय. आणि अगदी याउलट म्हणजे जेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेऊन इतरत्र ठिकाणी गुंतवू पाहतोय असं आढळून आल्यास बाजारानं तळ गाठलाय असं समजावं. नक्कीच हे अनुभव आपण घेतच आलेलो असतो.

आता हे झाले भौतिक व्यवहारिक अनुभव, परंतु बाजाराचा खरा रंग ओळखण्यापेक्षाही मत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे बाजाराचा बदललेला रंग ओळखणं आणि हे काहीशा सोप्या अभ्यासानं साध्य होऊ शकतं. त्यासाठी सर्वसाधारणपणे बाजाराचा कल म्हणजे ट्रेंड विचारात घेता येऊ शकतो. ट्रेंड इज युवर फ्रेंड असं मार्केटमध्ये उगाचच म्हटलं जात नाही. आता कल म्हणजे आला टेक्निकल म्हणजेच तांत्रिक भाग. आता अगदी बेसिक प्रश्न स्वतःलाच विचारूयात, की जर फक्त एखाद्या कंपनीचं मूलभूत विश्लेषण करून त्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे ठरवले तर ते कोणत्या भावात घ्यायचे; म्हणजे योग्य भाव कोणता आणि दुसरं म्हणजे रोज जर कंपनीबाबतच्या मूलभूत गोष्टी म्हणजेच फंडामेंटल्स बदलत नसतील तर प्रत्येक सेकंदागणिक त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या भावांत चढ-उतार का होताना दिसतात? याचं उत्तर एकच ते म्हणजे कोणत्याही गोष्टीची किंमत ही त्या गोष्टीसाठीचा मागणी वपुरवठा निश्चित करत असते आणि म्हणूनच इथं तांत्रिक विश्लेषणास महत्त्व प्राप्त होतं.

आता आधी काही नियम समजून घेऊ, नियम 1) चरीज्ञशीं वळीर्लेीपीीं र्शींशीूींहळपस (बाजारास सर्व गोष्टी अवगत असतात); नियम 2) खीं ीशषश्रशलीं ळपीें ींहश िीळलशी (कोणत्याही कंपनीच्या प्रत्येक भावातील हालचाल ही चार्टवर उमटली जातेच आणि त्या भावात त्या वेळची प्रत्येक गोष्ट समाविष्ट झालेली असते); नियम 3 : झीळलश र्ोींशी ळप ीींशपव (तक्त्यावर, भाव हे एका दिशेतच मार्गक्रमण करतात). पहिले दोन नियम हे कळावयास सोपे आहेत, परंतु तिसरा नियम समजायला अवघड आहे. आता प्रश्न आहे की भाव हे एका विशिष्ठ दिशेतच मार्गक्रमण का व कसे करतात? याचं उत्तर समजावून घेण्याचा प्रयत्न करू..

बाजारातील नियामकांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही संवेदनशील माहिती ही हळुहळू बाजारामध्ये फुटतेच. सर्वप्रथम ती फक्त अगदी आतील गोटापर्यंत मर्यादित असते. मग त्या गोटातील खास लोकांच्या जवळील मंडळीपर्यंत, नंतर विश्लेषक आणि मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत आणि शेवटी सामान्य जनतेपर्यंत पोहचत असते. या प्रसारणात कांही मिनिटांपासून ते दिवसांपर्यंत वेळ लागतो. अनेक वेळा अशा बातम्या बाजारात येईपर्यंत त्यासंबंधीत कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत हालचाल होऊन गेलेली असते. उदा. एखाद्या कंपनीच्या बाबतीतील विशेष घटना अथवा आगामी काळात जाहीर होणारे निर्णय हे त्या कंपनीच्या मालकांव्यतिरिक्त संचालक मंडळास, प्रवक्यांस नक्कीच माहिती असतात. जर ती माहिती कंपनीसाठी सकारात्मक असेल तर अशा व्यक्तींकडून किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून अशा कंपनीच्या शेअर्सची जोमानं खरेदी होते. नंतर जसजशी ही माहिती हळूहळू बाहेर येते तसतशी वर दिल्याप्रमाणे इतरांकडूनही खरेदी होऊ शकते. आता समजा अशा घडामोडींच्या आधी एखाद्या कंपनीचा भाव रु. 100 असेल तर सर्वप्रथम आतल्या गोटातील मंडळी म्हणजे कंपनीचे मालक, संचालक, प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, इ. लोक अचानक या कंपनीच्या शेअर्सच्या भावांवर तुटून पडतात व पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यानं हे भाव 101-102-103-110 पर्यंतदेखील वाढतात. तोपर्यंत, नंतरच्या गटातील लोकांना याची जाणीव होते व ते भाव खाली यायची वाट न पाहता 110च्या भावात उड्या मारतात व भाव 114-115पर्यंत घेऊन जातात. आता पहिल्या गोटातील किरकोळ असलेल्यांना साधारणपणे 14-15 %नफा मिळत असल्यानं त्यातील कांही नफावसुली करतात व भाव पुन्हा 107-110पर्यंत खाली येतात, परंतु ते तेजीच्या सुरुवातीच्या पायथ्याशी कधीच येत नाहीत याचं कारण म्हणजे ज्यांची सुरुवातीस खरेदी राहून गेलेली असते ते लोक या वाढून पडलेल्या भावात संधी साधतात व भाव पुन्हा 115पर्यंत पोहोचतात. त्यामुळं कल-दिशेसाठी आता 100-107-110-115 असे उच्चांक स्थापन झालेले दिसतात आणि यालाच आलेखावर ट्रेंड म्हटलं जातं. उदाहरणच द्यायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्रीजचं देता येईल. 22 फेब्रुवारी 2017 रोजी रिलायन्सनं जियोबद्दलची घोषणा केली आणि रिलायन्सच्या शेअरचा भाव त्याच दिवशीसुमारे 11 टक्क्यांनी वाढून मागील आठ वर्षांतील उच्चांकाजवळ पोहचला, परंतु बारकाईनं पाहिल्यास आता लक्षात येईल की याची मुहूर्तमेढ नोव्हेंबर 2016पासूनच झालेली दिसते. रिलायन्सचा भाव रु. 465वरून हळूहळू रु.548 झाला पुन्हा 507 रुपयांपर्यंत खाली येऊन 21 फेब्रुवारी म्हणजे अधिकृत घोषणेच्या आदल्या दिवशी पुन्हा 545 रु. झाला व 22 फेब्रुवारीचा त्याचा बंद भाव होता 603 रुपये. अगदी याच्या उलट बाब कंपनीमध्ये एखादी खराब बातमी असल्यास किंवा कंपनीस हानीकारक बाबी असल्यास घडू शकते. उदा. डीएचएफएल. कंपनीबाबतची नकारात्मक बातमी फुटली 21 सप्टेंबर 2018ला, परंतु या शेअर्सचा भाव 3 सप्टेंबर 2018 पासूनच हळूहळू खाली खाली येऊ लागला होता. 3 सप्टेंबरचा उच्चांक होता, रु. 691.5, तर 19 सप्टेंबरच्या म्हणजे आदल्या दिवशीचा भाव होता 610 रु. म्हणजे केवळ 11 सत्रांतच भाव तब्बल 12 टक्क्यांच्या आसपास पडला होता. तर अशा गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनं चार्टवर नमूद होतात. गरज असते ती फक्त कल ओळखण्याची.

बाजारात प्रमुख दोन प्रकारचेट्रेंड असतात, चढता कलवउतरता कल.

जेव्हा कोणताही भाव हा नवीन उच्चांक नोंदवत वरील बाजूनं मार्गक्रमण करत असतो व त्या नवीन उच्चांकांदरम्यान येणार्‍या दुय्यम ट्रेंड (करेक्शन) मधील नीचांक देखील चढ्या भावातील असतात. अगदी याउलट प्रकार हा उतरत्या ट्रेंडमध्ये आढळतो. यामध्ये भाव हे नवीन नीचांक नोंदवताना दिसतात, तर दरम्यानचे दुय्यम ट्रेंड (पुलबॅक) हे देखील आधीच्या उच्चांकापेक्षा कमी भावाचे असतात. अपट्रेंड व डाऊनट्रेंडमध्ये साधारणपणे तीन अवस्था असतात, संचयन, सहभागिता व वितरण. संचयन म्हणजे जिथं शेअर्स मोठ्या प्रमाणातगोळा केले जातात. सहभागिता म्हणजे पहिल्या गुंतवणूकदारांमागून या प्रवाहात दाखल झालेले, तर वितरण म्हणजे नफेखोरी ज्यावेळेस पहिले गुंतवणूकदार हे मिळालेल्या बातमीचा जोर कमी होऊ लागल्यामुळंआपले शेअर्स विकण्यासाठी इतर नवीन गुंतवणूकदारांच्या/ट्रेडर्सच्या शोधात असतातती अवस्था. उतरत्या ट्रेंडमध्ये याच अवस्था काहीशा उलट क्रमानं असू शकतात. म्हणजे खराब बातमी कळाली असल्यास सर्वप्रथम स्वतःकडं असलेल्या शेअर्सचं वाटप (गळ्यात मारणं), त्यानंतर इतरांची सहभागिता, यात घेणारे, विकणारे व ट्रेडर्स दोन्ही असू शकतात.असो, जर आपणास बाजाराचा नेमका रोख समजू शकलोतर त्याच्या आधारे चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम कमी राहू शकते.  बाजारात एकूण तीन कल असू शकतात. एक प्रमुख अथवा मूळ कल जो प्रदीर्घ काळासाठी असू शकतो व जो सहसा बदलत नाही (प्रदीर्घ काळासाठीच्या गुंतवणुकीसाठी), एक मध्यम काळासाठी (साधारणपणे 3-5 वर्षं) व एक तात्पुरता म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेंड, जो कांही महिने ते फारतर एखादवर्ष राहू शकतो. दोन उच्चांक अथवा दोन नीचांकांच्या आधारे आपण ट्रेंडलाईन (कलरेषा) आखू शकतो. अपट्रेंडमध्येअशा कलरेषा-आधारपातळीजवळ खरेदी करून आपल्या उद्दिष्टांनुसार नफेखोरी करून पुन्हा गुंतवणूक करावयाची झाल्यास भाव परत कलरेषेजवळ आल्यास गुंतवणूक करता येऊ शकते. जोपर्यंत कल बदलत नाही तोपर्यंतअसे ट्रेंड हे महत्त्वाचे ठरतात.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply