Tuesday , March 28 2023
Breaking News

विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव पायरीचीवाडी प्राथमिक शाळेचा उपक्रम

पाली : प्रतिनिधी

नांगरणी, पेरणी व लावणी आदी कामे विद्यार्थी पुस्तकातून अभ्यासतात. मात्र भात लावणीचा अनुभव विद्यार्थ्याना प्रत्यक्ष देता यावा, यासाठी सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुणाल पवार यांनी सोमवारी (दि.1) विद्यार्थ्याना प्रत्यक्ष शेतात नेऊन भात लावणी केली.

पावसाची सर्वत्र जोरदार सुरुवात झाली आहे. शेतात भात लावणीची कामे सुरु आहेत उपक्रमशील शिक्षक कुणाल पवार यांनी विद्यार्थ्याना आपण शेतात लावणीसाठी जायचे का? असे विचारल्यावर सर्वच विद्यार्थी आनंदाने तयार झाले. मग शाळेपासून जवळ असलेल्या शेतात भात लावणीसाठी विद्यार्थ्यांना नेण्यात आले. यावेळी भात रोपांचे प्रकार, खते तसेच भात रोपे कशी व किती अंतरावर लावावीत आदींची माहिती शेतकरी विजय जाधव यांनी विद्यार्थ्याना दिली. पुस्तकात वाचलेल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

-प्रत्यक्ष कृतीतून अध्ययन अनुभव दिल्यास विद्यार्थ्याच्या चटकन आकलन होते. पुस्तकात वाचलेल्या भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.

-कुणाल पवार,

मुख्याध्यापक, रा.जि.प. शाळा पायरीचीवाडी

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply