Breaking News

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंकडून अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

महिला मोर्चाकडून पोलिसांत तक्रार

नवी मुंबई : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वाशी येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष संतप्त झाला आहे. या प्रकरणी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गा डोख यांनी वाशी पोलिसांत तक्रार दिली असून गावडेंनी स्त्रीचा अपमान करणारे व्यक्तव्य केल्याचे दिसून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह विधान राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केल्याचा आरोप बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शनिवारी (दि. 26) पत्रकार परिषदेत बोलताना केला. अशोक गावडे यांना नवी मुंबई पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणीही आमदार म्हात्रे यांनी या वेळी केली.

राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास यंत्रणेने अटक केली आहे. मंत्री मलिक यांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील  महाविकास आघाडीने वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकात 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस याच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

दरम्यान, या संदर्भात नवी मुंबई भाजपच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांना निवेदन देण्यात आले. वाशी येथील पोलीस ठाण्यात रितरसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अशोक गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी आमदार म्हात्रे यांनी बोलताना केली आहे. या वेळी भाजप नवी मुंबई महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, भाजप नवी मुंबई युवती अध्यक्ष सुहासिनी नायडू, सुभाष गायकवाड,पांडुरंग आमले आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply