Breaking News

जेएनपीटीत हिंदी पंधरवडा उत्साहात साजरा

उरण : वार्ताहर

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. कोविड 19 महामारीच्या अनुषंगाने भारत सरकारच्या राजभाषा विभाग, गृह मंत्रालयाच्या वतीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत जेएनपीटीमध्ये हिंदी पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 14 सप्टेंबरला हिंदी पंधरवडा समापन समारंभ झाला.

आपल्या रोजच्या कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदीचा वापर अधिकाधिक करण्याच्या उद्देशाने कर्माचार्‍यांना प्रवृत्त करण्यासाठी आणि चालू असलेल्या उपक्रमांबाबत जागृती करण्यासाठी जेएनपीटीमध्ये दरवर्षी हिंदी पंधरवडा साजरा केला जातो. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात हिंदी पंधरवडा साजरा केला जातो. जेएनपीटीतर्फे हिंदी पखवाडा आयोजना दरम्यान आपल्या कर्मचार्‍यांसाठी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोविड – 19 साथीच्या आजारमुळे हिंदी पत्रलेखन, हिंदी निबंध लेखन व हिंदी कहानी लेखन स्पर्धा ऑनलाइन आयोजित करण्यात आल्या. त्याचबरोबर हिंदी टायपिंग स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली. या सर्व स्पर्धांमध्ये पोर्टचे अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले होते.

या वेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी हिंदीचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, प्रत्येकाला स्वतःच्या भाषेचा अभिमान वाटला पाहिजे आणि हिंदी दिवसाचे देशामध्ये खूप महत्त्व आहे आणि हिंदी ही सर्व भारतीयांना एकतेच्या सूत्रामध्ये बांधून ठेवते. पुढे त्यांनी जेएनपीटीच्या सर्व कर्मचार्‍यांना हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी आणि या संदर्भात जेएनपीटीचे अग्रणी स्थान कायम ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन कार्यामध्ये हिंदी भाषेचा अधिकाधिक प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply