पनवेल : रामप्रहर वृत्त
महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वतीने महापालिका क्षेत्रातील उद्यानांची पाहणी करून त्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 16) कळंबोली सेक्टर 10 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनची पाहणी करून या उद्यानात लाईट, बेंच, वॅकींग ट्रॅक आणि साफसफाई संदर्भातील सुचना अधिकार्यांना दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, उद्यान विभागीय अधिकारी राजेश कर्डिले, विद्युत विभाग अधिकारी प्रितम पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.