Breaking News

नेरूळमध्ये टॅग केलेला पक्षी रशियात

पाणथळ जागेचे संवर्धन करण्याची गरज; निसर्गप्रेमींचे आवाहन

नवी मुंबई : बातमीदार

139 वर्षे जुनी संशोधन संस्था असलेल्या बीएनएचएस म्हणजेच बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने टॅग केलेला पक्षी रशियामध्ये सापडला आहे. बीएनएचएसने नेरूळ येथे ही कल्पना राबवत कॉमन रेड शांक या पक्ष्याला काही महिन्यांपूर्वी टेग केले होते.  या पक्ष्याचे निरीक्षण केले जात होते. हा पक्षी 5 हजार 100 की.मी. प्रवास करत अखेर रशियात सापडला आहे.

नवी मुंबईमधील टीएस चाणक्य पाणथळ प्रदेशात हा पक्षी टॅग करण्यात आला होता. या यशस्वी प्रयोगामुळे बीएनएचएसने व पक्षी प्रेमींनी देखील आनंद व्यक्त केला आहे. जवळपास 30 सेमी लांब असलेल्या या पक्ष्याने मुंबईपासून रशियातील अल्टाईपर्यंत उड्डाण घेत प्रवास केला. जेथे रशियन बर्ड कन्झर्वेशन युनियन (आरबीसीयू)च्या अ‍ॅलेक्सी इबेल यांना हा पक्षी निदर्शनास आला. टॅग दिसल्यानंतर अ‍ॅलेक्सी यांनी बीएनएचएसला ई-मेल पाठवला आणि त्यानंतरच्या प्रक्रियेनंतर संस्थेने खात्री केली व  पुष्टी करू शकलो की तो पक्षी आम्हीच टॅग केला होता, असे बीएनएचएसचे संशोधक मृगंक प्रभू म्हणाले.

एका ट्विटमध्ये बीएनएचएसने सांगितले की, बीएनएचएसने टॅग केलेल्या या कॉमन रेड शांकने मुंबई ते अल्टाईपर्यंत किमान 5,100 किमी अंतर पार केले आहे.

दरम्यान, बीएनएचएसने टॅग केलेले पक्षी विविध ठिकाणी दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले.  खरेतर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या हवाई सुरक्षिततेचा भाग म्हणून फ्लाइट पॅटर्नचा अभ्यास करणा-या संशोधनांतर्गत त्यांनी टॅग केलेले काही पक्षी यापूर्वी मुंबईजवळील उरण व अलिबागमध्ये आढळून आले आहेत.

यामधून पक्षी भरारी घेण्यासाठी व विश्रांतीसाठी एकाच ठिकाणी वारंवार येण्याची त्यांचे वैशिष्टपूर्ण गुण ’साइट फिडेलिटी’ची पुष्टी मिळते, असे आणखी एक बीएनएचएस संशोधक म्हणाले. याच कारणामुळे आम्ही पक्ष्यांना सवय झालेली ठिकाणे चुकल्यासारखे वाटून त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होणे टाळण्यासाठी नवी मुंबई व मुंबईच्या पाणथळ जागेला वाचवण्याची मोहिम राबवत आलो आहोत, असे नॅटकनेक्टने सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply