Breaking News

भाषण कौशल्यासाठी विषयाचा अभ्यास असणे आवश्यक

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे मार्गदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जर आपल्याला चांगले भाषण करायचे असेल तर त्या विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितले. उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्यावतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्ये प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या दिवशी ते मार्गदर्शन करीत होते.

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींना चांगले भाषण कशाप्रकारे करावे याबाबात मार्गदर्शन केले. उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वक्तृत्वकला आणि संवाद कौशल्ये प्रशिक्षण शिबिर हे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वक्तृत्व आणि संवाद कौशल्यामध्ये ज्यांनी अभ्यास केला आहे आणि ती मांडण्याची त्यांची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे, असे मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबीराचे उद्घाटन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या हस्ते झाले तर समारोप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या उपस्थितीत झाला. समारोपावेळी कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य, जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक अक्षया चितळे, गणेश जगताप, शहर संयोजक संजीव कुलकर्णी उपस्थित होते.

शिबिरात 66 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. या वेळी माधव भंडारी यांनी दोन दिवस झालेल्या या प्रशिक्षण शिबिर पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply