Breaking News

महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई मनपा मुख्यालयात ध्वजारोहण

कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा सन्मान

नवी मुंबई ः बातमीदार

महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधून उत्तम काम करणा-या उद्यान व पाणीपुरवठा विभागात कार्यरत प्रत्येक विभागामधील एका कामगारास प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्त महोदय यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

उद्यान विभागातील कामगारांमध्ये लक्ष्मीबाई कोळी, कमला काळबोडे, सुमन खंदारे, व्दारकाबाई भगत, जानकी वानखडे, मंजुळा मुठे, झुंबरबाई  शेंगाळ या उद्यानातील महिला कामगारांचा तसेच पाणीपुरवठा विभागातील सरोज पासवान, सदानंद काकडे, किसन दिवाकर, रोहित कश्यप, दिपक पवार, बंदगी लोगावी, कैलास कांबळे, मच्छिंद्र पाटील, विजय ठाकून, मकरंद कुलकर्णी या जलवितरणामध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या 17 महिला व पुरूष कामगारांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस 30 एप्रिल ते 2 मे 2022 या कालावधीत विद्युत रोषणाई करण्यात आली असून हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ती बघण्यासाठीही नागरिक या परिसराला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply