Breaking News

राज्यात महिला हत्यांचे सत्र सुरूच; नगरमध्ये पत्नीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

अहमदनगर ः प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची घटना अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. लेंडेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. सुनील लेंडे हा पत्नी छाया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शनिवारी (दि. 22) संध्याकाळी शेतात गेल्यानंतर सुनीलने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिला जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply