पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल या स्वच्छता अभियान मोहिमेद्वारा नवीन पनवेल सेक्टर 04, द्वारका स्विट मार्ट समोर आपले घर, आपल्या घरासभोवतालचा परिसर व आपले पनवेल शहर कशाप्रकारे स्वच्छ व सुंदर ठेवावे. याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यासाठी एक पथनाट्य सादर करण्यात आले.
हे पथनाट्य ठाणे येथील श्रावस्ती नाट्य संस्थेने सादर केले. यात अजय कवढोणे, पुजा चव्हाण, संजय सदगीर, सागर पडांगळे, विजय कांबळे, अस्मिता घरत, कोमल मोरे, संदिप फुलसुंदर, दिपा जाधव आणि श्रीराम जोशी या नाट्यकलावंतांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट अभिनय आणि दिलखेचक संवादाने सादर केलेल्या या पथनाट्याचा आनंद तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी लुटला आणि स्वच्छतेचा बोध घेतला.
या वेळी कार्यक्षम नगरसेविका राजश्री वावेकर उपस्थित होत्या. त्यांनीही उपस्थित नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि पनवेल शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले. पनवेल महानगरपालिकेने नवीन पनवेल शहरातील (सेक्टर 1 ते 11 पर्यंत) स्वच्छता मोहिमेची जबाबदारी असलेले स्वच्छता निरीक्षक अजिंक्य हळदे यांनी या वेळी पुढाकार घेतला.