Breaking News

विंधणे आदिवासीवाडीत विविध दाखले वाटप

उरण : प्रतिनिधी

रायगडचे  जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियान अंतर्गत उरण तालुक्यातील विंधणे आदिवासी वाडीवर तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 5) विविध प्रकारच्या दाखले वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात तहसिलदार अंधारे आदिवासींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तालुक्यात एकही आदिवासी बांधव कोणत्याही दाखल्यासाठी वंचित राहणार नाहीत किंवा कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी आम्ही आमची टीम सातत्याने काम करत आहे. या बांधवाना  रेशनकार्ड कार्ड मिळाले आहे त्यांनाही लवकर अंत्योदय योजनेतून धान्य दिले जाईल. आजपयर्ंत तालुक्यात 80 ते 90 टक्के जातीचे दाखले पूर्ण झाले आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.  नायब तहसिलदार नरेश पेढवी म्हणाले, आपल्या समाजाने पुढे यायचे असले तर घरातील प्रत्येक स्त्रीने कुटुंबाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. त्यांच्या खाण्याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. मुलांना शाळेची ओढ लावली पाहिजे. मुले शाळेत गेली तरच ती आपले भविष्य घडवू शकतील. मात्र घरातील सर्व महिलांवर हे अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी महिलांनी आपले आदिवासी नृत्य सादर करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी जातीचे दाखले, रेशनकार्ड ,वनहक्क दाखले यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे प्रा. राजेंद्र मढवी, केअर ऑफ नेचर संस्थेचे राजू मुंबईकर, विंधणे उपसरपंच भारत डाकी, महसूल सहाय्यक शिवाजी सुर्यवाड, मंडळ अधिकारी एस.आर. रोडे, महा सेवा केंद्राचे अजय ठाकूर, वनरक्षक शितल पाटील, विंधणे पोलीस पाटील शुभांगी पाटील, तलाठी अर्जुन जमखंडी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, दत्ता गोंधळी, विशाल पाटील,अनिल घरत,शिक्षक राजेश चौगले आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply