पनवेल ः रामप्रहर वृत्त
तालुक्यातील वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन रामचंद्र घरत यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी (दि. 17) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पनवेल तालुक्यातील वळाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावावर ग्रामपंचायतीने सदस्य चेतन घरत यांनी स्वाक्षरी करून भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याने याबाबत तातडीने खुलासा करावा अशी नोटीस भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चेतन घरत यांना दिली आहे.