Saturday , December 3 2022

सुकापूरमध्ये अन्नछत्र ; भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती

 

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्व. मधूशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ आणि भाजप नेते प्रमोद मधूशेठ भगत यांच्या वाढदिवसापासून प्रत्येक महिन्याच्या दर गुरुवारी सुकापूर येथे अन्नछत्र हा उपक्रम राबवून गरीब व गरजूंना मोफत अन्नदान करण्यात येत. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 24) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत अन्नदान उपक्रम झाला. तसेच या वेळी अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
या वेळी सुकापूर माजी उपसरपंच बुवाशेठ विठ्ठल भगत, आकुर्ली सरपंच सचिन पाटील, भगतवाडी उद्योजक शशी विठ्ठल भगत, सुकापूर उपसरपंच दिनेश बुवा भगत, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, सुकापूर सरपंच योगिता पाटील, युवा नेते राजेश पाटील, सिमरन ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद भगत, सुकापुर ग्रामपंचायत सदस्य पुनम प्रमोद भगत, उद्योजक दीपक भगत, सदस्य प्राची जाधव, अ‍ॅड. सुवर्णा केंडे, किशोर केंडे
नवरत्न मेडिकलचे राजेश पटनी, विवेक पाटील, विकास तळेकर, अजय सैनी, भावेश दवे, रोहिदास चिखलेकर, डॉ. सुशांत शिंदे आदी उपस्थित होते.

Check Also

सीकेटी महाविद्यालयात एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स …

Leave a Reply