Breaking News

कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुमुक्षा घरतला ‘सुवर्ण’

मुरूड ः प्रतिनिधी

नेपाळ काठमांडूमधील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पहिली इंडो नेपाळ इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप नुकतीच झाली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चौल बागमळा येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मुमुक्षा आनंद घरत हिने काता विभागात सुवर्ण आणि कुमिते विभागात रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारतातून व नेपाळमधून सुमारे 50 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा काता व कुमिते अशी दोन विभागात घेण्यात आली. यात मुमुक्षा घरतने चमकदार कामगिरी केली. तिला मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. या वेळी प्रमुख प्रशिक्षक राहुल तावडे, प्रमुख संघटक राजेंद्र ओझा, आयोजक डॉ. दीपक कटारिया उपस्थित होते. चमकदार कामगिरीबद्दल मुमुक्षाचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply