Breaking News

कोंडाळकर्स क्रिकेट अ‍ॅकेडमीचे उद्घाटन

मोहोपाडा ः प्रतिनिधी

रिलायन्स इंडस्ट्रिजचे माजी कर्णधार, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर राजेंद्र कोंडाळकर यांनी लोधिवली रिलायन्स टाऊनशीप येथे क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. रिलायन्स पाताळगंगा पेट्रोकेमिकल्सचे प्रेसिडेंट आशु गर्ग, एचआर हेड थॉमस इसो यांच्या हस्ते कोंडाळकर क्रिकेट अकादमीचे उदघाटन करण्यात आले. या समारंभाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि सेक्रेटरी विनय बहुतुले यांनी उपस्थिती लावली तसेच रिलायन्स, आरसीएफ आणि टाटा या कंपनीचे माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. खालापूर तालुक्यात प्रथमच अद्ययावत क्रिकेट अ‍ॅकॅडमी सुरू झाल्याने अनेक होतकरू मुलांना क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी मदत होणार आहे. राजेंद्र कोंडाळकर हे उत्कृष्ट क्रिकेटपटू असून त्यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू तयार झाले आहेत. अधिक माहितीसाठी 9967648288 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply