Breaking News

बेलापूर गाव स्मार्ट व्हिलेजसाठी आमदार मंदा म्हात्रेंची ग्रामस्थांसह बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री यांच्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्वच गावे स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. दिवाळे गावासोबतच आता बेलापूर गावही स्मार्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांची बेलापूर गावातील राम मंदिर येथे ग्रामस्थांसह सर्व पक्षीय बैठक झाली.

या वेळी माजी नगरसेवक दि. ना. पाटील, अमित पाटील, ज्येष्ठ समाजसेवक महादेव पाटील, बाळकृष्ण बंदरे, रविंद्र म्हात्रे, राम मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोसाळकर, संदीप पाटील, सीमा मुकादम, शैला म्हात्रे, ज्योती पाटील, तुकाराम म्हात्रे, प्रकाश पाटील, संदेश पाटील तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी ग्रामस्थांनी राम मंदिराच्या बाजूचा भूखंड उत्सवाकरिता सिडकोकडून मागणी करणे, गावामध्ये मार्केट, उद्यान, खेळाचे मैदान उपलब्ध करून देणे,  समाजमंदिर उभारणे, गावाचा विकास करण्यासाठी अशी विविध विकास कामे करण्याबाबत मागणी ग्रामस्थांना कडून  करण्यात आली.

बेलापूर गाव हे शिक्षणाचे माहेर घर म्हणून नवी मुंबईत नावाजलेले असून एक स्मार्ट व्हिलेज  म्हणूनही ओळख निर्माण व्हावी याकरिता सिडकोने राखीव ठेवलेले भूखंड महापालिकेला हस्तांतरित केल्यास गावाचा विकास जलद गतीने करता येणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज व्हावे हे स्वप्न पाहिले असून ते आपण साकार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. बेलापूर गाव ही स्मार्ट व्हावे याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ यांचे आभार मानते, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी या वेळी म्हटले.

स्मार्ट व्हिलेजमुळे स्थानिकांना रोजगार, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, व्यायामशाळा, स्वच्छता गृहे, पार्किंग व्यवस्था अशा सुविधाही मिळणार आहेत. त्यामुळे गावाच्या विकासाकरिता एक सर्व पक्षीय समिती स्थापन करून त्यासाठी युवकांनी व महिलांनी पुढाकार घ्यावा.

-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply