Breaking News

रायगड जिल्ह्यातील खेळाडू नोकर्‍यांच्या प्रतीक्षेत

पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणार्‍या रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर औद्योगिकरण होत आहे. मोठमोठे प्रकल्प येत आहेत. त्याचबरोबर हा जिल्हा क्रीडाक्षेत्रामध्येही प्रगती करत आहे. अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचले आहेत. यापैकी अनेकांना रोजगार नाहीत. त्यांना नोकरी नाही. नोकरी नसल्यामुळे बर्‍याच खेळाडूंची कारकिर्द संपली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये या जिल्ह्यातील खेळाडूंना नोकरी मिळवून देण्यासाठी क्रीडा संघटनांनी प्रयत्न करायला हवेत. रायगड जिल्ह्यात अनेक मोठमोठे औद्योगिक प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंना फारकाही नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. सुरूवातीला काही खेळाडूंना जरूर नोकर्‍या मिळाल्या. त्यानंतर मात्र खेळाडूंची भरती झालीच नाही. रायगड जिल्ह्यात गुणवंत खेळाडूंची कमतरता नाही. परंतु त्यांना नोकर्‍या मिळत नाहीत. त्यामुळे खेळाडू नाराज होतात. नोकरी नसल्यामुळे खेळाडूंनी खेळ सोडून दिला आहे,अशी अनेक उदाहरणे या जिल्ह्यात आहेत. कबड्डीमहर्षी बुवा साळवी आणि स्व. प्रभाकर पाटील यांची चांगली मैत्री होती. बुवा साळवी आणि प्रभाकर पाटील यांच्यामुळे रायगड जिल्ह्यात कबड्डी खेळ वाढला.त्याचा फायदा रायगडला झाला. आज शेकडो कबड्डीपटूंना नोकर्‍या मिळाल्या. काही खेळाडू मुंबईतील कंपन्यामध्ये, बँकामध्ये, हॉस्पिटलमध्ये कामाला लागले. काही खेळाडू पोलीस दलात लागले. खेळाडू कबड्डीमुळे पोटापाण्याला लागले.त्यामुळे खेळ वाढला. आता खेळाडूंना नोकर्‍या मिळत नाहीत. त्यामुळे खेळाडू नाराज होतात. निराशेमुळे खेळाडू खेळ मध्येच सोडतात. रायगड जिल्ह्यात खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. परंतु खेळाडू आणि संघटनादेखील कमी पडतात. खेळाडू मेहनत घेत नाहीत. संघटना देणार्‍यांपर्यंत  पोहचत नाहीत. मदत करणारे आहेत. परंतु त्यांच्यापर्यत पोहचले पाहिजे. ते होत नाही. सर्वच शासनाने केले पाहिजे, ही भावना नसावी. आपल्या भागात एखादा चांगला खेळाडू असेल तर समाजानेदेखील त्याला मदत केली पाहिजे. नोकरी मिळाली नाही म्हणून अगदी बहरत असतानादेखील अनेक कबड्डीपटूंनी खेळ थांबवला आहे. त्यांची कारकिर्द संपली.  जिल्ह्यात अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांना नोकरी नाही. या खेळाडूंना योग्य वयात जर नोकरी मिळाली नाही तर हे खेळाडू देखील आपल्याला  नोकरी मिळत नाही म्हणून नाराज होतील. दरम्यान, अशा स्थितीमुळे खेळाडू एकतर जिल्हा सोडून जातात किंवा खेळ थांबवतात. रायगड जिल्ह्यात मोठमोठे औद्योगिक प्रकल्प आहेत. रिलायन्स, जेएसडब्ल्यू, आरसीएफ, ओएनजीसी, जेेएनपीए असे अनेक प्रकल्प आहेत. या कंपन्यामध्ये पूर्वी काही खेळाडूंना नोकरी मिळाली नंतर मात्र खेळाडूंची भरतीच झाली नाही. यातील काही कंपन्या काही ठराविक स्पर्धां पुरस्कृत करतात. त्यात तेथील स्थानिक लोक खूश होतात. परंतु नोकरीच नसेल  तर खेळाडूं काय करणार आहेत. जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राची प्रगती करायची असेल तर खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळायलाच हवे. खेळाडूंना स्थैर्य मिळाले पाहिजे. यासाठी सध्या जे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच भविष्यात येणार्‍या प्रकल्पांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंसाठी नोकरी देण्याची सक्ती केली पाहिजे. त्यासाठी केवळ  राजकीय नेत्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे नाही तर खेळाडूंच्या ज्या संघटना आहेत, त्यांनीदेखील यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शासकीय सेवेमध्ये खेळाडूंसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. परंतु त्या किती जणांना मिळाल्या आहेत. सध्या खेळाडूंना नोकरी मिळण्याचे एकमेव पर्याय आहे तो पोलीस दलाचा. येथे खेळाडूंसाठी चांगली संधी  असते. तेथे किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू हे पोलीस दलात आहेत. परंतु काही वेळा शैक्षणिक पात्रतेचा प्रश्न येतो. राष्ट्रीय खेळाडू असूनही शिक्षण कमी असल्यामुळे हे खेळाडू अपात्र ठरतात अशी  काही उदाहरणे या जिल्ह्यात आहेत. या खेळाडूंना खासगी औद्योगिक प्रकल्पांमध्येच नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना चांगली नोकरी मिळाली तर ते खेळात प्रगती करू शकतील. तसेच हे खेळाडू आपला जिल्हा सोडणार नाहीत. त्यामुळे ते आपल्याच गावात राहून भावी पिढी घडवू शकतील. रायगडातून चांगले खेळाडू तयार होऊ शकतील.  रायगडात गुणवंत खेळाडू आहेत. रायगडात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी वेळीच प्रयत्नांची गरज आहे.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply