चौक : रामप्रहर वृत्त
विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिर शाळेमध्ये शनिवारी (दि. 9) आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देवानंद कांबळे यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाशजी देशमुख यांनी वारीची परंपरा सांगितली. या वेळी सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिरच्या प्रांगणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सावी शिंदे, सिद्धि गावडे, प्रथम ठोंबरे, वरद घुमरे, प्रचिती देशमुख, चिन्मयी भोईर, चैतन्या भोईर, पियांशी ठोंबरे, चैतन्या भोईर, चिन्मयी भोईर, मनाली सावंत, पूर्वी येरुणकर, आरोही जाधव, मुग्धा ठोंबरे या तिसरी यत्तेतील मुलींनी अभंग, हरिपाठ, आरती, पसायदान सादर केले. त्यांना मयुरेश भोईर व धीरज गायखे यांनी पखवाज व ढोलकीची साथ दिली. संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनी विठ्ठल भेटीला हे गाणे सादर केले.
प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिरचे समन्वयक देवानंद कांबळे सिप्ला फाउंडेशनच्या उल्का धुरी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक या वेळी उपस्थित होते. दीपक शिंदे यांनी आभार मानले.