Breaking News

पनवेल तालुक्यात भाजपतर्फे विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकासकामे सातत्याने सुरुच आहेत. त्याअंतर्गत स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या विकासकामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील वाजे गावात राजेश भोईर ते नामदेव पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, उमरोली गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, भाणघर गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, मोर्बे गावात पेव्हर ब्लॉक बसविणे, केवाळे गावातील मुख्य रस्ता ते केवाळे शाळेपर्यंत  रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि केवाळे गावातील हरी दत्तू गायकर ते बळीराम गायकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम स्थानिक आमदार विकास निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सदस्या रेश्मा शेळके, पनवेल पंचायत समिती सदस्य तथा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भुपेंद्र पाटील, युवानेते शेखर शेळके, आनंद ढवळे, विश्वजीत पाटील यांच्यासह सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सिडको  अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका सरचिटणी प्रल्हाद केणी आणि पंचायत समिती सदस्य तथा युवामोर्चा तालुकाध्यक्ष भुपेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply