मुंबई : प्रतिनिधी
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी (दि. 14) मुंबईत येत आहेत. भाजप नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अपक्ष आमदार आणि खासदारांना मूर्मू यांच्यासह होणार्या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास मुंबईत येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारती पवार आणि अन्य नेते त्यांच्या समवेत असतील. भाजप, शिंदे गट व अपक्ष आमदार-खासदारांबरोबर मुर्मू यांची बैठक विमानतळाजवळील लीला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आपल्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन मुर्मू या बैठकीत करणार आहेत.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper