माजी नगरसेवक राजू सोनी यांची सामाजिक बांधिलकी
पनवेल : वार्ताहर
उरण नाका येथील यश हॉस्पिटलच्या खाली तसेच न्यू गणेश स्वीट मार्ट दुकानाच्या समोरच रस्त्यावरच फेव्हर ब्लॉक बसविताना काढलेली माती गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रस्त्यावरच पडून होती. याबाबत माजी नगरसेवक राजू सोनी यांनी दखल घेऊन त्यांचे सहकारी मंदार देसाई यांनी स्वखर्चाने कामगारांच्या मदतीने येथील मातीचा ढिगारा उचलला. यामुळे माजी नगरसेवक राजू सोनी यांचे नागरिकांसह, दुकानदार व पोलिसांनी आभार मानले. पनवेल परिसरातील नाक्यावर गेल्या 15 दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते. या वेळी यश हॉस्पिटलच्या खाली तसेच न्यू गणेश स्वीट मार्टच्या समोरच रस्त्यावर माती रस्त्याच्या बाजूला काढून ठेवली होती, हा मातीचा ढिगारा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, याबाबत येथील व्यापार्यांनी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. महापालिकेच्या कारवाईची वाट न बघता माजी नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ दखल घेऊन त्यांचे सहकारी मंदार देसाई यांना स्वखर्चाने हा अडथळा ठरणार मातीचा ढिगारा हटविण्यास सांगितले. त्यानुसार देसाई यांनी कामगाराच्या मदतीने हा मातीचा ढिगारा उचलला, यामुळे येथील नागरिक, वाहनचालक, व्यापारी व वाहतूक पोलिसांनी माजी नगरसेवक राजू सोनी यांचे आभार मानले. माजी नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ धाव घेत, स्वखर्चाने हा मातीचा ढिगारा उचलला, त्यामुळे व्यापारी वर्गाकडून सोनी यांचे आभार मानत असल्याचे येथील व्यापारी पुखराज चौधरी यांनी सांगितले.