Breaking News

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा एचआयएल कामगारांना दिलासा

खोपोली ः प्रतिनिधी

रसायनी येथील हिंदुस्थान इन्सेक्टिसाईड लिमिटेड (एचआयएल) कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांच्यासह कामगार प्रतिनिधींनी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. रसायनी येथील हिंदुस्थान इन्सेक्टिसाईड लिमिटेड (एचआयएल) भारत सरकारचा कारखाना असून सरकारने निर्गुंतवणूक  कार्यक्रमांतर्गत हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भाजपचे नेते सुनील गोगटे यांनी कारखाना बंद होऊ नये यासाठी कामगार प्रतिनिधींसोबत केंद्रस्तरावर पाठपुरावा करीत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली. या वेळी मंत्री पाटील यांनी तातडीने दिल्लीतील कंपनीचे वरिष्ठ अधिकारी चतुर्वेदी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. केंद्रीय आरोग्यमंत्री मन्सूख मांडविया यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन सर्व बाबींवर चर्चा करून मार्ग काढतो, असे आश्वासन चतुर्वेदी यांनी दिले.  त्वरित कार्यवाही केल्याने कामगारांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आभार मानले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply