Breaking News

रायगडकरांची पाणीटंचाईची समस्या सुटणार

जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव भरले

अलिबाग : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाची 28 पैकी 20 धरणे पूर्णपणे भरली आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) अखत्यारितील आठ लुघपाटबंधारे प्रकल्प आणि 39 पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील बहूतांश धरणे पुर्ण क्षमतेनी भरल्याने रायगडकरांची  पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे.

रायगड जिल्ह्यात सरासरी तीन हजार 142 मिलीमीटर पाऊस पडत असतो. या तुलनेत 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी 1678 मिलीमिटर पावसांची नोंद झाली आहे.  जुलै महिन्यात एक हजार 18 मिलिमीटर एवढे पावसाचे पर्जन्यमान असते. यंदा 20 जुलैपर्यंत एक हजार 321 मिलीमीटर पावसांची नोंद झाली आहे. म्हणजेच जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 20 दिवसात 113 टक्के पाऊस पडला आहे. या  पावसामुळे  जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

रायगड जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत 28 धरणे आहेत. यातील 20 धरणे पुर्ण क्षमतेनी भरली आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या नऊ लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी आठ प्रकल्प पुर्ण क्षमेतेने भरले आहेत. कर्जत तालुक्यातील पाथरज प्रकल्पातही 75 टक्के पाणी साठा जमा झाला असून येत्या काही दिवसात तोही भरण्याची शक्यता आहे. वडाचीवाडी, पहूर, पाखरशेत, कुडली 1, सरफळेवाडी हे पाझर तलाव येत्या दोन ते तीन दिवसात भरण्याची शक्यता आहे. त्यांच्यात 95 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. तर कर्जतमधील आर्ढे येथील पाझर तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply