पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील बळवली गावाचे सुपुत्र अजय कमलाकर पाटील यांनी गेल्या वर्षी 5555 जोर सूर्यनमस्कार काढून नावलौकिक मिळवला. त्यानंतर खए- बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका तासात 1700जोर सूर्यनमस्कार काढून विश्वविक्रम केला होता. याची दखल घेवून ओ माय गॉड बुक रेकॉर्ड यांच्या वतीने अजय पाटील याला हिंदी सिनेअभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते भारत वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंधेरी (पश्चिम) येथील मेयर हॉल येथे झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यात संचालक दिनेश गुप्ता आणि ‘मिस भारत‘ नंदिनी गुप्ता यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नॅशनल रेकॉर्ड करणार्या व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. अनेक दिग्गज कलाकार, सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते.