Breaking News

कशेडी घाटात ट्रक कोसळला, चालक जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट उतरून भरधाव वेगाने येणारा एक ट्रक गुरूवारी (दि. 1) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल 150 फूट दरीमध्ये कोसळला. या ट्रकमधील जखमी चालकाला पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले. ट्रकमधील क्लोरिन गॅस सिलेंडर शाबूत राहिल्याने संभाव्य गॅसगळती टळली आहे. आंध्रप्रदेश येथील एक ट्रक (एपी-21,टीवाय- 1449) रोहा औद्योगिक वसाहतीमध्ये क्लोरिन गॅस सिलेंडर घेऊन जात होता. गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामधील तीव्र वळण उतारावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट दरीमध्ये सुमारे दीडशे फूट खोल कोसळला. या अपघातात ट्रकचे टायर्स ट्रकपासून वेगळे झाले. ट्रक चालक लक्ष्मीरेड्डी चिनारेड्डी (वय 50, रा. पदीपाडू, ता. जि. करनूल) हा गंभीररित्या जखमी झाला.  त्याला प्रथम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. गॅस सिलेंडर दरीमध्ये इतस्तत: विखुरले गेले. सुदैवाने एकाही सिलिंडरचा स्फोट झाला नाही अथवा वायू गळती झाली नाही. शुक्रवारी सकाळी बचाव कार्य व पंचनामा करण्यात आला. या अपघाताची नोंद  पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरिक्षक भोसले करीत आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply