Breaking News

सुधागडातील नानोसेत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

ग्रामस्थांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील नानोसे बौद्धवाडी गावाला शुद्ध, मुबलक व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी  ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांकडे शुक्रवारी (दि. 2) निवेदनाद्वारे केली. जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत नानोसे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून नानोसे बौद्धवाडीत अनियमित, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच येथील प्राथमिक प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी यांचीदेखील पाण्याविना अतिशय गैरसोय झाली आहे. 28 ऑगस्ट 2022 रोजी परळी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेसमोर पाणी समस्येचा पाढा वाचूनदेखील न्याय्य मिळाला नाही. येत्या सात दिवसात पिण्याचे शुद्ध पाणी व पाण्यासंदर्भातील सर्व सोयी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी अमित गायकवाड, आनंद जाधव, राहुल गायकवाड, स्वप्नील गायकवाड, रवी लोखंडे, तुषार शिर्के, श्रद्धा शिंदे, आम्रपाली शिंदे, हर्षदा शिंदे, वनिता शिंदे, नीरा शिंदे, वैजयंता गायकवाड, रोहिणी गायकवाड, शैला गायकवाड, गौतमी गायकवाड,संगिता गायकवाड, कविता गायकवाड, अनुसया गायकवाड, साक्षी शिंदे, पुष्पा शिंदे आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …

Leave a Reply