कर्जत : बातमीदार
तालुक्यातील वडवली प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थी सार्थक सावंत याला नवी मुंबईतील श्री साई ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने व्हीलचेअर भेट दिली. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले यांनी शिफारस केली होती. श्री साई ट्रस्टकडून गेली 10 वर्षे कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्य सुरु आहे. सार्थक सावंत या विद्यार्थ्यांबद्दल वडवली शाळेचे मुख्याध्यापक परचुरे यांनी माणगाव तर्फे वरेडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले यांना माहिती दिली. घुले यांनी त्याबाबत श्री साई ट्रस्टकडे प्रस्ताव ठेवला आणि ट्रस्टकडून वडवली शाळेत व्हीलचेअर वाटप कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी ट्रस्ट नवी मुंबईच्या संचालिका राधिका घुले, वडवली शाळेचे मुख्याध्यापक पाचपुते, शिक्षक गांजाळे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.