Breaking News

मोदी-शहांकडे देशासाठी व्हिजन : टाटा

गांधीनगर : वृत्तसंस्था

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस)च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे देशासाठी एक व्हिजन आहे. त्यांनी अनेक दूरदर्शी पाऊले उचलली आहेत. हे सरकार गर्व वाटण्यासारखे आहे, आपल्याला अशा दूरदर्शी सरकारची मदत केली पाहिजे’, असे टाटा म्हणाले.

भारत एका नव्या भारताच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही रतन टाटा म्हणाले. देशातील तरुणांना पुरेशा संधीची गरज आहे, पण तरुण पूर्णपणे कौशल्यपूर्ण होतील तेव्हाच त्यांना या संधी मिळतील. तरुणांच्या कौशल्याविना देशाची प्रगती होऊ शकणार नाही. आपल्याला नव्या क्षमतांची आवश्यकता आहे आणि हे एका ध्येयपूर्ण संकल्पनेशिवाय शक्य नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

कौशल्य कार्यक्रमाशी जोडले जाण्याची संधी दिल्याबद्दल रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मी 20 वर्षांचा असतो, तर या कामात आणखी जास्त क्षमतेने सहभाग घेतला असता, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जानेवारीला देशातील प्रमुख 11 उद्योगपतींची भेट घेतली होती. या बैठकीला रतन टाटाही उपस्थित होते. बैठकीत आर्थिक विकास दर आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. सरकारचे कौतुक करण्यापेक्षा अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी सल्ला द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी या वेळी केले होते.

असे आहे आयआयएस गांधीनगरमध्ये 20 एकरात आयआयएसचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी कानपुरात 2016 आणि मुंबईत 2019मध्ये आयआयएसचे भूमिपूजन करण्यात आले होते. कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे या संस्थेची निर्मिती केली जात आहे. तरुणांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण बनविणे हा या संस्थेचा उद्देश आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply