Breaking News

दातार कंपनीला 1 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त
दातार अ‍ॅण्ड सन्स एक्सपोर्ट कंपनीने 1 नोव्हेंबरपर्यंत कामगरांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन काढण्याचा इशारा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिला आहे.
कसळखंड येथील दातार अ‍ॅण्ड सन्स एक्सपोर्ट कंपनीचे चार महिला कामगारांना कामावरून काढले होते. कागरांवरहोणार्‍या या अन्यायाविरोधात गुरुवारी (दि. 20) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्षध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली कंपनीसमोर गेटबंद आंदोलन करण्यात आले. या वेळी जोपर्यंत कामगरांना सन्मानाने आत घेत नाहीत, तसेच त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा गेट उघडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतेला. त्यानंतर तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौडकर यांच्या मध्यस्थीने कंपनी प्रशासनासोबत बैठक झाली. या बैठकीत कामगरांचे प्रश्न सोडवण्याचे येतील, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र कंपनी प्रशासनाला अल्टिमेटम देत कामगरांचा प्रश्न 1 नोव्हेंबरपर्यंत न सोडवल्यास भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या आंदोलानामध्ये भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, पंचायत समितीच्या माजी सदस्या तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पंचायत सिमतीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, कसळखंचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, रविंद्र कोरडे, योगेश लहाने, अ‍ॅड. संजय टेंभे, कसळखंडच्या सरपंच माधुरी पाटील, शिवाजी माळी, पोयंजे विभागीय अध्यक्ष प्रविण ठाकूर, पोयंजे युवा मोर्चा अध्यक्ष गणेश आगिवले, उपाध्यक्ष राजेश लबडे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनिल माळी, प्रतिक भोईर, वावेघर माजी सरपंच राजेश माळी, कविता घरत, माई गायकर, दत्ता गायकर, ताणाजी पाटील, संतोष पाटील, जयेश मते, रोहिदार जुंगारे, प्रवीण पाटील, योगेश गायकर, प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply