Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षदत्तक योजनाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वृक्षदत्तक योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20) महाविद्यालयाच्या प्रांगणात नारळाचे रोप लावून करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अ‍ॅड. भगीरथ शिंदे हे उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सीए कुणाल लाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, उपप्राचार्य एस. इ. संदनशीव तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या स्टाफने प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्ष भेट दिले असून त्याचे रोपण व संवर्धन त्या विद्यार्थ्याने करावयाचे आहे. हे वृक्ष आपल्या घराजवळ रोपण करून पालकांसोबत सेल्फी काढून झाडाच्या वाढीबाबत महाविद्यालयाला व्हॉट्सअ‍ॅपवर कळवायचे आहे, तसेच या झाडांना क्यूआर कोड देऊन त्या संदर्भातील माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 600 विद्यार्थ्यांना केशर आंबा रोपांचे वाटप केलेले आहे.
या कार्यक्रमासाठी वनविभागाचे वनाधिकारी निकम यांनीदेखील 150 काजूची रोपे महाविद्यालयास स्वतःच्या खर्चातून दिलेली आहेत. महाविद्यालयाने महाविद्यालय परिसरात व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या घरात वृक्षसंवर्धनाची चळवळ जावी या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाचे लोकनेते रामशेठ ठाकूर, अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांनी कौतुक करून या योजनेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply