Breaking News

कै. विठ्ठल चाहु केणी मैदानाच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : वार्ताहर
चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या गावांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतर करण्यात आले. या गावांना हक्काचे मैदान मिळावे यासाठी ग्रामस्थांचा सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता, मात्र सिडकोने चिंचपाडा विठ्ठलवाडी समोरील मैदान देण्यात आले आहे. या मैदानाला चिंचपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते कै. विठ्ठल चाहु केणी यांचे नाव देत या नावाच्या नामफलकाचे अनावरण मंगळवारी (दि. 25) ज्येष्ठ माजी क्रिकेट खेळाडू सुरेश महादेव केणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चिंचपाडा ग्रामस्थ व तरुणे उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पनवेल तालुक्यातील 10 गावांतील जमिनींचे संपादन करून विकसित करण्यात येत आहे. त्याचबरोबर चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या प्रकल्पबाधित गावांतील ग्रामस्थांचे स्थलांतर येथील पुनर्वसन आणि पुनर्स्थापना क्षेत्रात करण्यात आले आहे. आता पुनर्वसन झाल्यानंतर खेळ खेळण्यासाठी मैदानाची उणिवा तरुणांना भासत होती. येथील ग्रामस्थांनी सिडकोकडे आम्हाला खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता असल्याने लवकरात लवकर मैदान मिळावे यासाठी येथील ग्रामस्थांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर चिंचपाडा विठ्ठलवाडीसमोर सिडकोने खेळाचे मैदान आरक्षित केले. त्यानुसार त्या मैदानाचे कामही प्रगतीपथावर आहे.
चिंचपाडा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कै. विठ्ठल चाहु केणी यांचे नाव देण्यात आले. या वेळी चिंचपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी खेळाडू, युवा खेळाडू त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply