Breaking News

मास्क न लावणार्यावर दंडात्मक कारवाई

उरण नगरपरिषदेची धडक मोहीम

उरण : वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उरण नगरपरिषदेतर्फे शहरात मास्क न लावणार्‍यावर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे.

बुधवारी (दि. 17) मोरा येथे 10 नागरिकांवर व गुरुवार (दि. 18)  गणपती चौक उरण, राजपाल नाका, पालवी हॉस्पिटल येथे विनामास्क फिरणार्‍या 27 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर पोलिसांनी 13 जणांवर फोटो काढून ऑनलाइन कारवाई केली.

मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या फैलावाचे भान विसरून उरण शहरात तोंडाला मास्क न लावता  फिरणार्‍या नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये एवढी दंडाची आकारणी करण्यात आली आहे.

मोहिमेत उरण नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांसह पोलिसांचाही सहभाग असल्याने ही मास्क न लावणार्‍यांवर कारवाई करणे सुलभ बनले आहे. या मोहिमेत उरण नगरपरिषदेचे जगदीश म्हात्रे, धनेश कासारे, राकेश कामेटकर, महेंद्र साळवी, नरेंद्र उभारे, प्रमोद मटकर, विनोद गायकवाड, आकाश कवडे, पोलीस हवालदार एस. के. भाट, पोलीस नाईक टी. डी. खिल्लारे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी न करणे या व्यतिरिक्त कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडे सध्यातरी उपलब्ध नाही. परंतु काही नागरिक, महिला मास्क न लावता सर्रासपणे बाजारपेठेत वावरताना दिसत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत आहे. ही मोहीम उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तो कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुज्ञ व्हावे, नागरिकांनी मास्कचा वापर करावा, स्वच्छता पाळावी. सुरक्षित अंतर पाळावे, अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. घरी रहा, सुरक्षित रहा.

-संतोष माळी, मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply