Breaking News

माथेरानमध्ये लवकरच चाकावरचे उपहारगृह होणार सुरू

मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
प्रवासी, पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात निवांतपणे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी सीएसएमटी आणि नागपूर स्थानक हद्दीत ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू करण्यात आले असून प्रवासी, पर्यटकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरानमध्येही चाकावरचे उपहारगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेची पाहणी आणि अन्य कामे प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.
माथेरानमध्ये मोठ्या संख्येने येणारे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेतात. चाकावरचे उपहारगृह उपलब्ध झाल्यास त्यालाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत सीएसएमटीमधील या उपहारगृहात सव्वालाख, तर नागपूरमधील उपहारगृहात दीड लाख नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. आता चाकावरच्या उपहारगृहासाठी पर्यटस्थळ असलेल्या माथेरानची निवड करण्यात आली आहे. माथेरानमध्ये या उपहारगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply