पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान इंदापूर (पुणे) येथे बेंच प्रेस स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर अशा विविध गटाच्या ई क्विप आणि अनई क्विप स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत सीनिअर 74 किलो वजनी गटात रायगडच्या अक्षय शनमुगमयाने सुवर्ण पदक प्राप्त करून सीनिअर स्ट्राँगमन 2022 हा किताब प्राप्त केला.
या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी एकूण आठ पदके प्राप्त केली आहेत, तसेच ज्युनिअर स्पर्धेत उपविजतेपद प्राप्त केले आहे.
कुणाल पिंगळे ज्युनिअर 53 किलो गट सुवर्ण, दिनेश पवार मास्टर 74 किलो गट सुवर्ण, अक्षय शनमुगम सीनिअर 74 किलो गट सुवर्ण, सनत क्षिरसागर ज्युनिअर 59 किलो वजनी गट कांस्य, ऋतिक पोळ ज्युनिअर 120 किलो वजनी गट रौप्य, शुभम कांगले 120 किलो वजनी गट सीनिअर ब्राँझ, सुहानी गावडे 43 किलो सबज्युनिअर मुली रौप्य, संतोष गावडे 59 किलो वजनी गट मास्टर सुवर्ण पदक पटकावले. सर्व खेळाडूंचे रायगड पॉवरलिफ्टिंगचे अध्यक्ष गिरीश वेदक, सेक्रेटरी अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, संदीप पाटकर, राहुल गजरमल, यशवंत मोकल, राज्य संघटनेचे सेक्रेटरी संजय सरदेसाई यांनी अभिनंदन केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …