पनवेल ः प्रतिनिधी
आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत सरपंच सम्राट पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवारी (दि. 26) अलिबाग येथे झाला. या वेळी पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच माधुरी अनिल पाटील यांनी कळसखंड ग्रामपंचायतीमध्ये विविध आदर्शवत कामे करीत गावाचा विकास साधला आहे.
त्याचबरोबर कोरोना काळात जनजागृती, अन्नधान्य वाटप, लसीकरण मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.