उरण : वार्ताहर
जागतिक लोकप्रिय नेते तथा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत शुक्रवारी (दि. 18) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, जेएनपीटी रुग्णालयाचे चिकित्सा अधीक्षक डॉ. राज हिंगोरानी, उपअधीक्षक संजय राठोर, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घरत, वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, हेमंत भोईर, तेजस पाटील, प्रवीण कोळी, माजी नगरसेवक राजेश कोळी, हितेश शाह, भूषण भोईर, नवीन शेवा अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, देवेंद्र पाटील, प्रा. राजेंद्र मढवी आदी उपस्थित होते.
या वेळी उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, जेएनपीटी कोविड रुग्णालय विभाग, बोकडवीरा येथील सिडको ट्रेनिंग सेंटर आदी ठिकाणी रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
Check Also
उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper