Breaking News

माणगाव, पोलादपूर नगरपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

माणगाव : प्रतिनिधी

येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदाची आरक्षण सोडत सोमवारी (दि. 15)  सकाळी माणगाव तहसील कार्यालय काढण्यात आली. 17 सदस्यांच्या माणगाव नगरपंचायतीमधील नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने ते नाराज झाले आहेत. माणगाव नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली होती. त्यानंतर आता 2021 मध्ये नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या उपस्थितीत सोमवारी  सकाळी येथील तहसील कार्यालयात नगरपंचायतीच्या सदस्यपदाची सोडत काढण्यात आली. अशोकदादा साबळे विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दिया विजय कराडे हिच्या हस्ते चिठ्ठी काढून हे आरक्षण निश्चित करण्यात आले. भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश सुळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, ज्ञानदेव पवार, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, मनसेचे देवेंद्र गायकवाड, तसेच रवींद्र मोरे, महामूद धुंदवारे, राजाभाऊ जाधव, नितीन वाढवळ, हेमंत शेट, राजू मुंढे, प्रतीक रहाटे, अजित तारळेकर, कपिल गायकवाड, गणेश चव्हाण, राजेश मेहता, अनंता थळकर, रणधीर कनोजे, सचिन देसाई, सिद्धांत देसाई, सुनील पवार, सुमित काळे आदींसह विविध राजकीय पक्षांचे  कार्यकर्ते, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या आरक्षणामुळे गेल्या वर्षभरापासून इच्छुक असलेल्या अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे माणगाव नगरपंचायत हद्दीत कही खुशी कही गम ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता संपूर्ण माणगावकरांचे लक्ष निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याकडे लागले आहे.

वार्ड क्रमांक : आरक्षण

वार्ड क्र. 1  : अनु. जमाती महिला

वार्ड क्र.2   : अनु. जाती महिला

वार्ड क्र.3   : सर्वसाधारण खुला

वार्ड क्र.4   : सर्वसाधारण महिला

वार्ड क्र.5   : सर्वसाधारण खुला

वार्ड क्र.6   : नामाप्र महिला

वार्ड क्र.7   : सर्वसाधारण महिला

वार्ड क्र.8   : नामाप्र महिला

वार्ड क्र.9   : सर्वसाधारण महिला

वार्ड क्र.10  : सर्वसाधारण महिला

वार्ड क्र.11  : अनुसूचित जाती

वार्ड क्र.12  : सर्वसाधारण खुला

वार्ड क्र.13  : सर्वसाधारण महिला

वार्ड क्र.14  : नामाप्र सर्वसाधारण

वार्ड क्र.15  : सर्वसाधारण खुला

वार्ड क्र.16  : सर्वसाधारण खुला

वार्ड क्र.17  : नामाप्र सर्वसाधारण पोलादपूर : येथील नगरपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 15) आरक्षण सोडत काढण्यात आली. सदस्य पदाच्या 17 पैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. पोलादपूरमधील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या उपस्थितीत सोमवारी नगरपंचायत सदस्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी प्रभाग क्रमांक 1मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग 2मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 4मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 9मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 11मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12मध्ये मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 13मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 14मध्ये नामप्र सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 15मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 17मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले आहे, अशी माहिती देण्यात आली.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply