नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. लष्कराचे हे एअर डिफेन्स युनिट पाककडून होणार्या आगळीकीला उत्तर देण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेला घेराबंदी करण्याच्या दृष्टीने लष्कराची तुकडी आणि एअर डिफेन्स युनिट तैनात करण्यात
येणार आहे.
या एअर डिफेन्स युनिटमुळे पाककडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांना लागलीच चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. एअर डिफेन्स सिस्टीम जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, राजस्थानला लागून असलेल्या पाकच्या नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात येणार आहे. शत्रू राष्ट्रांकडून होत असलेले हवाई हल्ले रोखण्याची यात ताकद आहे. एअर डिफेन्स युनिट आकाश मिसाइल्स व रशियन क्वादार्ट सिस्टीमने बनवण्यात आले आहे, तसेच लवकरच यात लष्कराला इस्रायल आणि डीआरडीओने बनवलेल्या चठ-ड-च् डिफेन्स सिस्टीमही मिळणार आहेत.