Breaking News

मोहा कोळीवाडा चषक क्रिकेट स्पर्धेचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
साईनाथ क्रिकेट क्लब आणि यंग स्टार यांच्या वतीने मोहा कोळीवाडा चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 24) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन समारंभास वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, माजी सरपंच नर्मदा विठ्ठलशेठ ओवळेकर, तरघर सरपंच सविता मच्छींद्र कोळी, उत्तम कोळी, उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर, मदन पाटील, दीपक गोंधळी, प्रवीण ठाकूर, वहाळचे सदस्य वितेश म्हात्रे, प्रणय कोळी, नंदकुमार ठाकूर, प्रवीण ठाकूर, महादेव कोळी, चंद्रकांत कोळी, विक्रम कोळी, बाळाराम कोळी, लक्ष्मणबुवा कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी व खेळाडू उपस्थित होते. स्पर्धा 26 फेबु्रवारीपर्यंत रंगणार असून विजेते संघ व गुणवंत खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

Check Also

नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …

Leave a Reply