भारतीय लष्कराचा युनिफॉर्म बदलणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय लष्कराच्या गणवेशात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी लष्कराच्या मुख्यालयाने अधिकार्‍यांकडून सूचना मागवल्या आहेत. लष्करी मुख्यालयाने देशातील जवळपास 11 संचालनालयांना यासाठी पत्र पाठवले आहे. लवकरात लवकर तुमच्या सूचना पाठवा, असे मुख्यालयाने पत्रात म्हटले आहे.

लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट व सुटसुटीत व्हावा याबद्दल मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांत चर्चा झाली. अनेक देशांच्या लष्कराच्या गणवेशात पँट आणि शर्टचा रंग वेगळा आहे. याच धर्तीवर भारतीय लष्कराच्या गणवेशात बदल केला जाऊ शकतो, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकार्‍याने वर्तवली आहे. भारतीय लष्करी अधिकार्‍यांच्या गणवेशावर एक पट्टी असते. त्यावर लावण्यात आलेल्या स्टार्सवरून अधिकार्‍याचे पद कळते, तर अमेरिका व ब्रिटनमध्ये छातीवर लावण्यात आलेल्या चिन्हांवरून अधिकार्‍यांचे पद समजते. ही बाबदेखील गणवेशात बदल करताना लक्षात घेतली जाणार आहे.

जवानांच्या बेल्टमध्येही बदल करण्याची सूचना काही अधिकार्‍यांनी दिली. हा बेल्ट न वापरल्यास गणवेश अधिक स्मार्ट व सुटसुटीत होईल, असे काही अधिकार्‍यांचे मत आहे. लष्कराच्या गणवेशात यापूर्वीही लहानसहान बदल झाले आहेत.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply