Breaking News

रायगडातून परतताना पर्यटकांचे हाल

रस्त्यांवर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

अलिबाग ः प्रतिनिधी
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष स्वागतासाठी रायगडात आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात चांगलेच हाल होत आहेत. एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या त्याही अपुर्‍या पडल्या. तिकीट काढण्यासाठी अलिबाग एसटी स्टँडवर प्रवाशांची मोठी रांग लागली होती. खासगी प्रवासी वाहतूक करणारे पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करीत आहेत. त्यात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. 31 डिसेंबर रोजी रात्री थर्टीफर्स्टची पार्टी आणि त्यानंतर नवीन वर्षाचे स्वागत करून सोमवारी पर्यटक परतीच्या मार्गावर लागले. अलिबाग, रेवदंडा बससथानकात तसेच वेगवेगळया थांब्यांवर पर्यटकांची गर्दी झाली होती, मात्र एसटी बसेस पुरेशा नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. अलिबाग ते पनवेल मार्गावर सातत्याने बस धावत होत्या, तर पुण्यासाठीदेखील संध्याकाळी दोन जादा बसेस सोडण्यात आल्या. अलिबाग एसटी आगारातून पनवेलसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या अपुर्‍या पडत होत्या. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी लांब रांग लागली होती. त्यामुळे अनेकांनी खासगी गाड्यांचा आधार घेतला. खासगी वाहतूक करणारे प्रवाशांची लूट करीत होते. पनवेलपर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाचे 300 रुपये भाडे आकारले जात होते.
जलमार्गाने प्रवास करणारया प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. पीएनपी आणि मालदार या प्रवासी जलवाहतूक करणर्‍या बोटींचे पूर्ण दिवसाठी बुकिंग झाले होते. त्यामुळे पर्यटकानी अजंटा बोटीने जाण्याचा पर्याय निवडला तेथेदेखील रांग होती. मांडवा जेटीवर पर्यटकांची तोबा गर्दी झाली होती. तेथेही प्रवाशांमध्ये अनेक वादाचे प्रसंग उद्भवल्याचे दिसून आले.

प्रवाशांना भूर्दंड
रायगडअलिबाग एसटी आगारातून पनवेलसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या अपुर्‍या पडल्याने तिकिटासाठी लांब रांग लागली होती. त्यामुळे अनेकांनी खासगी गाड्यांचा आधार घेतला. खासगी वाहतूक करणारे प्रवाशांची लूट करीत होते. पनवेलपर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाचे 300 रुपये भाडे आकारले जात होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply