Breaking News

भिंगारी येथे शॉटसर्किट मुळे कारला आग

पनवेल : वार्ताहर
पनवेल जवळील भिंगरी येथील एचपी पेट्रोलपंपा जवळ एका महिंद्रा एक्सव्ही गाडीला शॉटसर्किट मुळे अचानकपणे आग लागल्याची घटना आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारास घडली आहे.
पळस्पे बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्‍या रस्तावरुन सिल्वर रंगाची महिंद्रा एक्सव्ही गाडी नंबर एमएच 04 एफएफ 9329 घेऊन दोघेजण येत असताना अचानकपणे गाडीच्या बोनेट मधून धूर येऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या ताब्यातील गाडी एचपी पेट्रोलपंपा जवळ उभी करून मॅकेनिकला बघण्यासाठी ते दोघे गाडी बाहेर पडताच गाडीने अचानकपणे पेट घेतला.
आजुबाजूच्या नागरीकांनी गाडीला लागलेली आग विझवण्यासाठी तेथे धाव घेतली. काहींनी वाहतूक शाखेचे पोलीस तसेच अग्निशमक दलाला कळवले. त्यांचे पथके घटनास्थळी दाखल होताच शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत गाडीचे पूर्णतः नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply